पोलिसांचा ‘अजब’ कारभार, वॉरंट रद्द असतानाही केली अटक

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अपघाताच्या गुन्ह्यातील वॉरंट न्यायालयाने रद्द केले असतानाही पोलिसांनी एका शेतक-याला अटक केली. अटक करुन पोलिसांनी या शेतक-याला ‘थर्ड डिग्री’ दिली. या प्रकारामुळे शेतक-याला मनस्ताप सहन करावा लागला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शिवडी येथील शेतकरी बाबाजी क्षीरसागर यांना निफाड न्यायालयाने अपघाताच्या गुन्ह्यात गैरहजर राहिल्याने अजामिनपात्र अटक वॉरंट काढाले होते. बाबाजी क्षीरसागर यांची आई आजारी असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. तसे न्यायालयाला त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने क्षीरसागर यांना शंभर रुपयांचा दंड भरण्यास सांगून वॉरंट रद्द केले होते.

दरम्यान, पोलिसांनी बाबाजी क्षीरसागर यांना अटक करुन पोलीस ठाण्यात घेऊन आले. या ठिकाणी बाबाजी क्षीरसागर यांनी न्यायालयाने वॉरंट रद्द केले असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच न्यायालयात दंड भरल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केल्याचे सांगून पोलिसांना दंड भरल्याची पावती दाखवली. मात्र, पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. बाबाजी क्षीरसागर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी क्षीरसगार यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे क्षीरसागर यांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर क्षीरसागर यांनी न्यायालयातून जामीन घेऊन पोलिसांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. परंतु पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून संबंधीत पोलिसांवर कारवाई करणार का असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे.

आरोग्य विषयक वृत्त 

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे