‘बोल्ड सीन’ला नकार देणाऱ्या ‘तमन्नानं’ ‘या’ सिनेमात घातली ‘बिकीनी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार विशाल कृष्णाच्या ‘अक्शन’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये विशाल जबरदस्त अ‍ॅक्शन सीन आणि स्टंट करताना दिसत आहे. या टीजरमध्येच अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि आकांक्षा पुरीचीही झलक पाहायला मिळाली. खास बात अशी की, टीजरच्या एका सीनने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं तो म्हणजे त्यातील अभिनेत्रीचा बोल्ड सीन. हाच बोल्ड अवतार सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होताना दिसतोय.

या टीजरच्या सीनमध्ये अभिनेत्री ग्रीन कलरच्या बिकीनीत दिसत आहे. लोक या अभिनेत्रीला तमन्ना भाटीया समजत आहेत. त्यांना वाटत आहे की तमन्नाच या सीनमध्ये बिकीनीत दिसत आहे. परंतु हे खरं नाही. बिकीनीतील अभिनेत्री तमन्ना नाही, तर सिनेमातील दुसरी अ‍ॅक्ट्रेस आकांक्षा पुरी आहे.

तमन्ना भाटीयाने काही दिवसांपूर्वीच सांगतिलं आहे की, ती मोठ्या पडद्यावर किसिंग सीन किंवा बिकीनी सीन देणार नाही. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली की, “मी एक गोष्ट कायम मेंटेन केली आहे की, मी ऑन स्क्रीन कधी ना ही बिकीनी घालणार आणि ना ही किसिंग सीन करणार. मला हे अबाधित ठेवायचं आहे. मी अशा सीन्ससासाठी कंफर्टेब नाही.”

अभिनेत्री आकांक्षा पुरीने अ‍ॅक्शन या सिनेमाचा टीजर आपल्या इसंटाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये आकांक्षा म्हणते की, “अ‍ॅक्शनचा टीजर रिलीज झाला आहे, ज्यात मी कियाराची भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. या शानदार चित्रपटाचा भाग झाल्याने गर्व वाटत आहे.”

View this post on Instagram

@nikki_rajani @tinamukharjee ❤️❤️❤️

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

#BoleChudiyan conference

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

#GQBestDressed

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like