ताज्या बातम्या

रेसिंग बाईक, बुलेटवर विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई, तीन लाखांचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे वाहतूक शाखेकडून सोमवारी (दि.६) विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत रेसिंग बाईक्स, बुलेटला लावलेल्या अनधिकृत सयलेंसर तसेच वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश नव नियुक्त पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी वाहतूक शाखेला दिले होते. त्यानुसार सोमवारी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ९१९ वाहनचाकांकडून २ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

भरधाव वेगात रेसिंग बाईक्स चालवणाऱ्या ३६ वाहन चालकांवर करावाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून २३ हजार १०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धक्कादाय म्हणजे या रेसिंग बईक्स अल्पवयीन मुलांना चालताना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B079YPY3TP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9267c01-9a4a-11e8-be30-431876c20a46′]
बुलेटला एकावर एक असे डबल सायलेन्सर, मोठ्या-अतिमोठ्या तोंडाचे सायलेन्सर, लांबट शंखासारखे निमुळते सायलेन्सर असे अनधिकृत सायलेंन्सर लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन काद्यानुसार बुलेटला असे सायलेंसर लावणाऱ्या २०० वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख २० हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या २६५ वाहनचालाकंवर करावाई करुन ४२ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना जामर लावून तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४१८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन ६९ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
[amazon_link asins=’B00L9O780Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db4c5473-9a4a-11e8-a660-c787641770f7′]
वाहतूक शाखेकडून विशेष मोहिम राबवून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ९१९ वाहन चालकांवर करावाई करुन २ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

 

Back to top button