Love Jihad : आता लग्न लावून देणार्‍या मौलवी-पुजार्‍यावर कारवाई होणार; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले ‘हे’ विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशनेही ‘लव्ह जिहाद’बाबत नवा कायदा बनविलाय. मध्य प्रदेश राज्यात त्याला शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलीय. मध्य प्रदेशच्या नवीन कायद्यामध्ये 19 तरतुदी आहेत.

नव्या कायद्याबद्दल एका प्रसारमाध्यमाशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, आम्ही मध्य प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठा कायदा बनविलाय. मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरविले जाईल. या कायद्यात 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

अशा विवाह सोहळ्यांना प्रोत्साहित करणार्‍या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल. पुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. मिश्रा म्हणाले, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले, याप्रकरणी तपास ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा उच्चस्तरीय दर्जाच्या अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात येईल. धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020 मध्ये 25 आणि 50 हजार, एक लाख रुपयांच्या दंड रकमेचे 3 टप्प्यांत दंड आकारला आहे.

दंडाची रक्कम इतकी जास्त का आहे ? याबाबात नरोत्तम मिश्रा म्हणाले, भीती निर्माण व्हावी म्हणून रक्कम वाढवलीय. यूपी कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मिश्रा म्हणाले, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. हा देशातील सर्वात कठोर कायदा आहे. सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल.

मिश्रा म्हणाले, देशातील कोणत्याही राज्यातील कोणतेही सरकार असो कायदा आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. जे लोक कोणत्याही धर्मातील मुलीला मोहात पाडून त्याचे धर्मांतर करून लग्न करतात, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. या विधेयकाद्वारे धर्म स्वातंत्र्य विधेयक 1968 निष्क्रिय मानण्यात येईल.

‘लव्ह जिहाद’बाबत नरोत्तम मिश्रा म्हणाले, कोण काय म्हणतो, हा वेगळा विषय आहे. जो कोणी एखाद्याशी भुरळ घालून, जबरदस्तीने किंवा नशाच्या अवस्थेत एखाद्याशी लग्न करेल ती व्यक्तीे शिक्षेस पात्र ठरेल.