डॉल्बी लावणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : अभिनव देशमुख

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

प्रतिनिधी : शिल्पा माजगावकर

काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर या काळात सार्वजनिक मंडळांकडून डॉल्बी सिस्टीमचा वापर होऊ नये आणि गणेशोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी कोल्हापूर पोलीस दल आणि कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी डॉल्बी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी गणेश उत्सव काळात आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळे डॉल्बी सिस्टीम लावून असल्या त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. डॉल्बी सिस्टीम वरून कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात दरवर्षी हमरीतुमरी होते, आणि पोलीस दलाकडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. यावर शांततेत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल आणि शहरातील विविध भागात असणाऱ्या गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्ते आणि प्रशासन या दोघांच्या बाजू सध्या ऐकून घेण्यात आल्या. बहुतांश कार्यकर्ते डॉलबीला विरोध करत असले तरीही गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र डॉल्बीचा तसेच साऊंड सिस्टिम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला बंदी असून गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केला आहे.

गणेश उत्सवात कोल्हापुरात ऐतिहासिक देखावे सादर करण्यात येतात. हे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक कोल्हापुरात दाखल होत असतात. देखावे पाहण्यासाठी रात्री वेळ वाढवून द्यावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. आहे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेश मंडळ आणि पोलीस दल एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घेणार मागे