तोंडाला मास्क नसणार्‍या व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर RT-PCR चाचणीसह दंडात्मक कारवाई

परभणी : गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीचे संकट निर्माण झाले होते. यावर प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तथापि, काही हौसे गवसे यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. प्रशासनाने अशा निष्काळजी पणे वावरणाऱ्या अनेक व्यक्तींवर कारवाया केल्या.

आपल्या दिसून आले असेल की बरेच काही लोक मूखपट्टी ( मास्क ) न घालता घराबाहेर पडतात. म्हणून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अशा व्यक्तींविरुद्ध सोमवारी पाथरी येथे पोलीस न.प प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने कारवाईची मोहीम घेण्यात आली आहे. या कारवाईतून मोठा आर्थिक दंड वसूल करण्यात आला. मूखपट्टीचा वापर न करणाऱ्या तसेच निष्काळजीपणे बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून आरटी-पीसीआर ( rt-pcr) चाचणी करण्यात आली.

प्रशासनाच्या या मोहिमेचा विनाकारण घराबाहेर पडणार यांना चांगलाच चाप लागला सोमवारी राबवण्यात आलेल्या मोहिमेत पाथरी पोलिस नगर परिषद कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आपला सहभाग नोंदवला विनाकारण घराबाहेर दुचाकी घेऊन फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच आज मंगळवार रोजी रस्त्यावरील किरकोळ व्यापाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम घेण्यात आल्याचे दिसून आले यात रस्त्यावरील फुल विक्रेते यांचे हात गाडे नगरपालिकेने ताब्यात घेतले. मंगळवार रोजी पार पडलेल्या या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमवंशी, डॉक्टर मनोज आहिरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला