‘येवले चहा’चं लाल रंगाचं बिंग फुटलं ! चहात ‘भेसळ’ असल्याचा FDA च्या प्रयोगशाळेचा ‘अहवाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पावधीत प्रसिद्ध झालेला आणि ग्राहकांच्या पसंतीस पडलेला येवले चहा अडचणीत आल्याचं दिसत आहे. येवलेवर पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. या चहात भेसळ असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारच्या एफडीए विभागाच्या प्रयोगशाळेतल्या अहवालामध्ये या चहात भेसळ असल्याचं सिद्ध झालं आहे.

एफडीएनं येवले चहावर कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही या चहावर कारवाई करण्यात आली होती. विभागानं येवलेतील काही नमुनेही जप्त केले होते. परंतु तेव्हा मात्र या चहात कोणतीही भेसळ असल्याचं दिसून आलं नव्हतं. परंतु आता दुसऱ्यांदा कारवाई झाल्यानंतर यात भेसळ असल्याचं समोर आलं आहे. येवले चहामध्ये सिंथेटीक फूड कलर असल्याचं दुसऱ्या अहवालात समोर आलं आहे. हेच कारण आहे की, या चहाला लाल रंग येतो. केंद्रीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आता पुन्हा एकदा येवले चहा अडचणीत आल्याचं दिसत आहे.

येवले चहावर कारवाई झाल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनानं उप्तादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही येवले चहावर कारवाई झाली होती. पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळू आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा येवलेवर कारवाई झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –