Activa पेक्षा कमी खर्चात धावते ही Car, फुल पैसा वसूल आहे मायलेज, चेक करा किंमत

नवी दिल्ली – Activa | जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि पेट्रोलची किंमत पाहून संकोच करत असाल तर CNG कार खरेदी करू शकता. सीएनजी कारमध्ये खूप चांगले मायलेज मिळते. अनेक सीएनजी कार चालवण्याचा खर्च अ‍ॅक्टिव्हापेक्षा (Activa) कमी आहे. येथे आपण अशा कारबद्दल जाणून घेणार आहोत, जी बजेट फ्रेंडली आणि मायलेज देखील खूप चांगले देते.

२०२२ मध्ये भारतात नवीन ऑल्टो K10 लाँच केल्यानंतर, मारुती सुझुकीने यावर्षी K10 चे CNG मॉडेल देखील लॉन्च केले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.९४ लाख रुपये आहे.

Alto K10 CNG मध्ये K-Series 1.0-litre पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन Alto 800 पेक्षा अधिक शक्तिशाली आणि मारुती सुझुकीच्या Celerio सारखे आहे. हे इंजिन ५६ bhp पॉवर आणि ८२ Nm टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी हॅचबॅकच्या फक्त एकच मॉडेल व्हीएक्सआयमध्ये S-CNG पर्याय देते. कंपनीचा दावा आहे की ही कार
एक किलो सीएनजीमध्ये ३३.८५ किलोमीटर मायलेज देते.

अल्टो के१० मध्ये ७-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते जी Android Auto आणि Apple
CarPlay या दोन्हींना सपोर्ट करते. तसेच, यात नवीन डॅशबोर्ड, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टीयरिंग व्हील आहे. (Activa)

सुरक्षेच्या दृष्टीने, कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ईबीडी सह एबीएस सारखे
फिचर्स मिळतात. या कारमध्ये कलरचे ६ पर्याय मिळतील, ज्यात सॉलिड व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे,
सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड यांचा समावेश आहे.

Web Title :-  Activa | maruti suzuki alto k10 mileage more than honda activa best car in under 5 lakh budget

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

Shivsena Shinde Group | मुंबई महापालिकेत राडा, पालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी (VIDEO)