बाळासाहेब आंबेडकरांना ताब्यात घेतल्याचा पाथरी येथे निषेध

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई येथील आरे काॅलनीतील झाडे तोडल्याचा निषेध करण्यासाठी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर गेले असता त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले याचा पाथरी येथील भारिप, रिपब्लीकन सेना व भारतीय बौध्द महासभेच्या वतीने निषेध करण्यात आला.

सविस्तर वृत असे कि मुंबई येथील आरे काॅलनीतील जंगल तोडीच्या निषेध करण्यासाठी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर गेले असता त्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले. हा प्रकार म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे. म्हणुन पाथरी येथे भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौध्द महासभा व रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाच्या या पक्षपाती धोरणाचा पाथरी पोलीसांना दि.६/१०/२०१९ रोजी एक निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

या वेळी भारिप नेते प्रकाश उजागरे, भारिप जि. उपाअध्यक्ष शामराव ढवळे, भारिप युवा जि. अध्यक्ष दिलीप मोरे, भारिप नेते भास्कर साळवे, रिपब्लीकन सेनेचे दिलीप घागरमाळे, भारिप युवा नेते कूमार भालेराव, युवा नेते लिंबाजी ढवळे, सुरेश नरवडे, लखन वाकडे, गंगाधर उजगरे, दत्ता पैढने, अशोक नरवडे, बाळु वावळे, चंद्रशेखर खरात आदींच्या सदर निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Visit : Policenama.com