Video : ‘या’ मराठी अभिनेत्याचा बदललेल्या लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ॲक्ट्रेस कायमच आपला लुक चेंज करताना दिसत असतात. अलीकडच्या काळात अनेक अभिनेतेही असा प्रयोग करताना दिसत असतात. परंतु मराठी अभिनेते असे प्रयोग कमी करतात किंवा आपला लुक चेंज करत नाहीत अशी ओरड खूपदा ऐकायला मिळाली आहे. सध्याची नवी पिढी याला अपवाद ठरताना दिसत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे सैराट (Sairat) सिनेमात परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) हा आहे.

आकाशला तुम्ही सिंपल भूमिकेत पाहिलंच आहे. आता पिळदार शरीर आणि रॉकिंग अंदाजात स्टाईल मारताना तो दिसत आहे. त्यानं लुकवर खूप मेहनत घेतली आहे. सध्या त्याच्या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे.

आकाश लवकरच एका वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 1962 : द वॉर इन द हिल्स असं या वेब सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये आकाश प्रमुख भूमिकेत आहे. महेश मांजरेकर डायरेक्टेड या सीरिजमध्ये अक्षय देओल आणि सुमित व्यास हे कलाकारही असणार आहेत.

याबाबत बोलताना आकाश म्हणाला, सैन्यात दाखल होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यासाठी मी दोन वेळा परीक्षाही दिली होती. पोलीस दलात काम करण्यासाठीही मी प्रयत्न केला होता. परंतु अभिनयाचा योगायोग आयुष्यात असल्यानं सैन्यदल स्वप्नच राहिलं. मी जर अॅक्टर झालो नसतो तर निश्चितच देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असतो.

सीरीजबद्दल बोलायचं झालं तर या सीरिजची कथा ही वास्तविक घटनांवर आधारीत आहे. भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीचीही झलक यात पहायला मिळणार आहे. आकाश यात भारतीय जवानाची भूमिका साकारत आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होणार आहे.