… म्हणून आमिर खानवर नेटकरी प्रचंड नाराज

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडलाय. सध्या ट्विटरवर आमिर खानविरोधात नेटकर्‍यांचा नाराजीचा सूर आढळत आहे. आमिरने आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तुर्कीमधील फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्रपतींच्या पत्नीची रविवारी भेट घेतलीय. त्यांच्या भेटीचे फोटो एमीन एर्दोगान यांनी ट्वीट केले. त्यानंतर भारतात या फोटोवर नेटकर्‍यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

सध्या आमिर खानत्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला ’लाल सिंह चड्डा’ सिनेमाच्या शूटिंग करत आहे. याचें शूटिंग तुर्कस्थानमधील वेगवेगळ्या भागांत होत आहे. या शूटिंगदरम्यान आमिर सध्या तुर्कीत आहे. तिथे रविवारी त्याने राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगान यांची भेट घेतलीय.

तुर्की देशाचे राष्ट्रपती पाकिस्तानला सपोर्ट करतात. देशात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवताना त्याचा विरोध करणारे ही तुर्कीचे राष्ट्रपतीचे होते. त्यामुळे आमिर खानने ही भेट घेणं अपेक्षित नाही, असा नेटकर्‍यांचा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

2018 साली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट आमिर खान यांनी नाकारली. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना भेटले होते. तेव्हा शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी ही भेट नाकारली होती. इस्रायलने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा दिला आहे, असे असतानाही इम्रान खान यांनी त्यांची भेट नाकारली होती. तर, तुर्कस्थानचे राष्ट्रपती खुलेआम पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरवरून होणार्‍या वादात पाकिस्तानची बाजू घेतात, अशातच आमिरने त्यांना भेटणं अपेक्षित नव्हते.

अभिनेता आमिर खानच्या भेटीने तुर्कीची पहिला महिला खूश आहेत तर अशावेळा एकीकडे भारतात मात्र नेटकर्‍यांनी आमिरला यावरून ट्रोल केलंय. त्याच्या आगामी सिनेमावर बंदी घालण्याबाबतही अनेक नेटकर्‍यांनी कमेंट्स केल्याचे आढळत आहे.