…लतादीदी तुम्ही माझ्या कानशिलात लावू शकता ‘या’ अभिनेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजय देवगन,अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित अशी एकापेक्षा एक मोठी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला. टोटल धमालचा हा तिसरा भाग आहे. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मुंगडा’ या गाण्याचे रिक्रिएटेड गाणे आहे. या गाण्यावरुन लता मंगेशकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर अभिनेता अजय देवगण ने ” जर लताजींना वाईट वाटले असेल तर त्‍या मला माझ्‍या कानशिलात लगावू शकतात. असे करण्‍याचा त्‍यांना संपूर्ण अधिकार आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी घेऊन त्यांचे रिमेक करण्याचे जबरद्स्त फॅड सुरु आहे. टोटल धमाल -३ या चित्रपटात देखील जुन्या मुंगडा या गाण्याला रिक्रिएट करण्यात आले आहे. जेष्ठ गायिका गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अनेकदा रिक्रिएट व्हर्जनवर आक्षेप घेतला आहे. टोटल धमाल वरील मुंगडा हे रिक्रिएटेड गाणे देखील लताजींना आवडलेले नाही. त्यांनी या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान यांनी ही नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर अभिनेता अजय देवगण यावर प्रतिक्रिया देत म्हणाला ” लताजी खूप सिनिअर आहेत. बॉलिवूडमध्ये यावेळी खूप सारी गाणी रिक्रिएट केली जात आहेत. ते लोक याबद्दल विचार करीत नाहीत. जर लताजींना वाईट वाटले असेल तर त्या मला कानशिलात लगावू शकतात. असे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मी खरे बोलत आहे . त्या मला रागवू शकतात. त्यांना वाईट वाटले असेल तर मी माफी मागायला तयार आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेता अजय देवगण यांनी दिली आहे.