मोडले अनेक ‘रेकॉर्ड’ ! ‘बाहुबली’नंतर फक्त ‘तान्हाजी’च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 46 दिवस झाले तरी या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. आत्तापर्यंत देशातील चित्रपटांच्या कामाईचे विक्रम पाहिले तर हा चित्रपट नवा विक्रम करणार असे दिसून येत आहे. या चित्रपटाने देशात आतापर्यंत 275 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने महाराष्ट्रात सर्वाधिक गल्ला जमवला आहे. बाहुबली-2 नंतर सर्वाधिक गल्ला जमावणारा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट ठरला आहे. अजय देवगण याने या चित्रपटात तान्हाजीची मुख्य भूमिका केली आहे. त्याच्या या भूमिकेने सर्वांवर जादू केली आहे. चित्रपटाने अमिर खान याच्या दंगल चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने भारतातच नाही तर विदेशात देखील चांगली कमाई केली आहे. विदेशात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’चा समावेश होणार आहे. या चित्रपटाने सलमान खान, शाहरुख खान आणि अमिर खान यांच्या चित्रपटांना मागे टाकत अनेक विक्रम मोडले आहेत. मंलग आणि शिकारा या चित्रपटामुळे ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ च्या कमाईवर परिणाम होईल असे भाकित करण्यात आले होते. मात्र, दोन्ही चित्रपटांनी निराशा केल्याने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like