Breaking : 26 वर्षीय अभिनेता अक्षत उत्कर्षच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत खूनाचा FIR दाखल

वृत्तसंस्था – मुंबईच्या अंधेरी भागात राहणारा 26 वर्षीय अभिनेता अक्षत उत्कर्ष चौधरीच्या मृत्यूप्रकरणी आता मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात भादंवि 302, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापुर्वी हा गुन्हा बिहार पोलिसांनी झिरो एफआयआर अन्वये नोंदविला होता. दरम्यान, यापुर्वी मुंबई पोलिसांनी अक्षत उत्कर्षचा अकस्मित मृत्यू झाल्याचं नोंदविलं होतं.

सप्टेंबर 2020 च्या शेवटच्या आठवडयात अक्षतचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला होता. कुटुंबियांनी मृतदेह बिहार येथे नेला. त्यावेळी देखील मुंबई पोलिस अक्षतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. अखेर आज अक्षतच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like