अरुण ‘गवळीं’च्या लेकीचा ‘या’ मराठमोळ्या ‘अभिनेत्याशी’ झाला ‘साखरपुडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या मुलीचा अभिनेता अक्षय वाघमारेशी साखरपुडा झाला. नुकत्याच पार पडलेल्या या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अरुण गवळींच्या मुलीचे नाव योगिता आहे.

अक्षय हा अभिनेता आहे, फत्तेशिकस्त या चित्रपटातून तो सगळ्यांच्या समोर आला. यात तो कोयाजी बांदल यांच्या भूमिकेत होता. या साखरपुड्याला योगिता आणि अक्षयचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. ही सारखपुडा एका हॉटेलमध्ये पार पडला.

अभिनेता क्षितिज दाते, अभिनेत्री विभागवी देशपांडे, मुग्धा परांजपे, अभिनेता हृषिकेश देशपांडे यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/B6YGYsTH6L9/?utm_source=ig_web_copy_link

योगिता अक्षयचं अरेंन्ज लव्ह मॅरेज –
योगिता अक्षय मागील 5 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. त्यानंतर दोघांच्या कुटूंबाने आता लग्नबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. अक्षय म्हणाला की आम्ही दोघे खूप आनंदी आहोत. कुटूंबीयांनी लग्नचा सल्ला दिल्यानंतर आम्ही लग्नाचा विचार केला, मगच निर्णय घेतला.

योगिता महिलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी एक एनजीओ चालवते. अक्षयने आता पर्यंत युथ, दोस्तगिरी, बेधडक आणि होऊ दे जरासा उशीर या चित्रपटातून कामं केलं. तसेच छोट्या पडद्यावर ती फुलराणी या मालिकेत तो झळकला. योगिता आणि अक्षय पुढील वर्षी 2020 च्या फेब्रुवारीमध्ये लग्नबंधानात अडकतील.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/