‘लॉकडाऊन’मध्ये अभिनेता अली फजलला सतावतेय गर्लफ्रेंडची आठवण, पोलिसांकडून घेणार भेटण्यासाठी परवानगी !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात दुसऱ्यांदा लागू लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे जो 3 मे 2020 पर्यंत असणार आहे. अशात गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री ऋचा चड्ढापासून दूर असणारा अभिनेता अली फजल ऋचाला मिस करत आहे. त्यानं तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन तो ऋचाला भेटण्यााठी जाणार आहे असं त्यानं बोलून दाखवलं आहे.

https://www.instagram.com/p/B_P3aFKjil8/

अली आणि ऋचा यांनी आपलं रिलेशन आता पब्लिक केलं आहे. एप्रिलमध्ये दोघं लग्न करणार होते. परंतु कोरोनामुळं त्यांचंही लग्न रद्द झालं आहे. ऋचाच्या घरी जाऊन त्याला ऋचाला भेटण्याची इच्छा आहे. यासाठी तो मुंबई पोलिसांकडून कायदेशीर परवानगी घेण्याचाही विचार करत आहे. एका मुलाखतीत विनोद करत अली म्हणाला, “ऋचापासून दूर राहून माझा क्वारंटाईनमध्ये राहणं अवघड आहे. मी विचार करत आहे की, मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन तिला भेटायला जावं.”

https://www.instagram.com/p/B9bsyRODono/

लग्न रद्द झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना अली म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे की आम्ही कोणतंही पेमेंट केलेलं नाही. नशीबाचे आभार मानायला हवे. कोणताही प्लॅन आम्ही केला नव्हता त्यामुळं आम्ही वाचलो. तसं तर चांगलं नाही वाटत परंतु असं वाटत आहे की, कदाचित देवाला हेच मंजूर आहे की, या सगळ्यानंतर आम्ही एका नव्या दुनियेत सर्वांसोबत सेलिब्रेट करावं.”

https://www.instagram.com/p/B7aR5AqDnEA/

https://www.instagram.com/p/B65dVSHqfT_/

https://www.instagram.com/p/B4cZd6mDr8L/