Video : आई ‘तेजी बच्चन’च्या आठवणीने ‘बिग बी’ झाले भावुक ; स्वत: तयार केलेलं ‘हे’ गाणं केलं शेअर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलांसाठी आपले पुर्ण आयुष्य त्याच्या सुखासाठी घालवणे, सतत मुलांचा विचार करणे त्यांच्यासाठी जगणे हे फक्त आई आणि वडील करु शकतात. यामध्ये मोलाचा वाटा असतो तो म्हणजे आईचा. आई ही मुला-मुलींच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असते. आईसारखा आधार जगात कुठेच मिळू शकत नाही. आजच्या दिवसाचे औचित्य साधून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ‘मदर्स डे’ च्या एक दिवस आधी आपल्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केल्याच पहायला मिळाले.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘मदर्स डे’ निमित्त औचित्य साधून ट्विटरवर एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्यामधून ते आईच्या आठवणीमध्ये भावनिक झाल्याचे दिसून आले. हे गाणे अमिताभ बच्चन, शुजित सरकार, अनुज गर्ग आणि त्यांच्या लहान मुलगा यांनी मिळून तयार केले आहे. या गाण्यातील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईला तेजी बच्चन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या मुलासाठी आईंच प्रेम कायमच अगणित आणि पवित्र राहिलं आहे. सगळ्या प्रेमाची समीकरणं बदलली तरी आई-मुलांच्या प्रेमाच्या समीकरणात बदल होणार नाही. आईच्या याच भावनेचा सन्मान करत बॉलिवूडचा अभिनेता अमिताभ बच्चन यांनी जागतिक मातृदिन म्हणून एक दिवस आधी आई तेजी बच्चन यांना श्रद्धांजली दिली.

अमिताभ बच्चन यांनी ‘मदर्स डे’ याचे निमित्त साधत एक गाणं ट्विटरवर शेअर केले आहे. या गाण्यामधून ते आईच्या आठवणीमध्ये भावुक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ‘माँ’ असे शीर्षक या गाण्याला देण्यात आले आहे. हे गाणं सुंदर शब्दांमध्ये गुंफण्यात आले आहे. आईप्रतीचं प्रेम, तिचा संघर्ष, मुलांसाठी तिने केलेला त्याग, तिची जिद्द या साऱ्यावर भाष्य या गाण्यात केले आहे. या गाण्याची निर्मिती चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांच्यासह करण्यात आली असून संगीत अनुज गर्ग यांनी दिले आहे. या गाण्याची रचना पुनीत शर्मा यांनी केली आहे.