खा. नुसरत जहाँचा पतीसोबतचा बेडरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली अ‍ॅक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ काही ना काही काराणाने सोशलवर नेहमीच चर्चेत असतात. खासदार झाल्यापासून ते त्यांनी केलेल्या लव्ह मॅरेजचीदेखील आजवर खूप चर्चा झाली आहे. पुन्हा एकदा आपल्या व्हिडीओमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. नुसरत जहाँ यांनी पतीसोबतचा बेडरूममधील एक रोमँटीक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, नुसरत पती निखिल जैनसोबत बेडरूममध्ये आहेत. व्हिडीओमध्ये दोघांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. बॉलिवूडमधील हे शोना या गाण्यावर दोघेहीअ‍ॅक्टींग करताना दिसत आहेत. नुसरत यांच्या हजारो चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या अ‍ॅक्टींगचं कौतुक केलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

निखिल जैन सोबत लग्न केल्यानंतर नुसरत जहाँवर मुस्लिम धर्मगुरूंनी अनेकदा टीका केली आहे. त्यांनी कुंकू लावल्यानंतर आणि भांगात सिंदूर लावल्यानंतरही मुस्लिम धर्मगुरूंनी त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. परंतु आजवर नुसरत यांनी कोणत्याही टीकेला जुमानलं नाही. वेळोवेळी त्यांनी याला प्रत्युत्तरही दिलं आहे.

View this post on Instagram

Light up lives with love.. @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

Amar pujor prem.. !!! Shubho Panchami..!! @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like