सिने अभिनेत्रीशी लगट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिनेत्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठी चित्रपटातील अभिनेत्रीशी गेल्या दोन वर्षापासुन वेळोवेळी लगट करण्याचा प्रयत्न करून पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरूममध्ये पुन्हा अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न करणार्‍या स्मार्ट अभिनेत्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07D11MDBS,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab839c8e-aeb6-11e8-8a04-3b88fe3fc638′]

सुभाष दत्‍तात्रय यादव (27, रा. शिवआराधना सोसायटी, शास्त्री रोड) असे त्या मराठी अभिनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईत राहणार्‍या 23 वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दोन वर्षापासुन एका मराठी चित्रपटाचे राज्यात विविध ठिकाणी शुटींग चालु आहे. सुभाष यादवने वेळावेळी अभिनेत्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने त्यांना फोन केला. त्याला अभिनेत्रीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तरी देखील सुभाषने त्यांचा पाठलाग सोडला नाही. तो वेळावेळी त्यांना फोन करून त्रास देत होता. सुभाषच्या सांगण्याप्रमाणे अभिनेत्री संपर्कात आली नाही तर तो तिला बदनाम करण्याची धमकी देखील देत होता. बदनामी करण्याची धमकी देत असल्याने फिर्यादी अभिनेत्री या त्याला भेटण्यासाठी चर्तुःश्रृंगी मंदिर परिसरात समजावुन सांगण्यासाठी गेल्या.
[amazon_link asins=’B07417987C,B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1a8ca5c-aeb6-11e8-a00d-3dbe8cc9472e’]

मात्र, पुन्हा सुभाष त्यांना बदनामी करण्याची धमकी देत होता. प्रकरण वाढु नये म्हणुन अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने पोलिसांना 100 नंबरवर फोन करून तक्रार दिली. तात्काळ दोन पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्यांना लागलीच पांडवनगर पोलिस चौकीत नेले. त्यावेळी आरोपी सुभाष यादवने मराठी अभिनेत्रीची माफी मागितली. त्यामुळे अभिनेत्रीने त्यावेळी सुभाषविरूध्द पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासुन सुभाषने त्यांना पुन्हा टार्गेट करणे सुरू केले. सुभाषने एक व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी फिर्यादीच्या मोबाईलचा वापर झाला असा आरोप लावुन त्याने फिर्यादी अभिनेत्रीच्या मोबाईल नंबरचा अज्ञात व्यक्‍ती म्हणुन दिशाभुलदर्शक अर्ज केला होता. चौकशीअंती सत्य समोर आले.

आरोपी सुभाषचा उद्देश हा फिर्यादीची इच्छा नसताना त्यांना लगट करण्याचा दिसून आले. प्रकरण संपण्याच्या दिशेने असताना सुध्दा वानवडी पोलिस ठाण्यात फिर्यादी अभिनेत्री या लेडीज वॉशरूममध्ये गेल्या असता आरोपी सुभाषने त्यांच्या मागोमाग जावुन त्यांचा रस्ता आढवला तसेच लगट करण्याच्या उद्देशाने त्यांना अस्पष्ट बोलण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6771b60-aeb6-11e8-b848-4d01770cddad’]

मराठी अभिनेत्रीने शेवटी अभिनेता सुभाष यादव याच्याविरूध्द विनयभंगाची तक्रार केली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी सुभाष यादवला शनिवारी रात्री अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत. दरम्यान, सुभाष यादव याची न्यायालयाने रविवारी जामिनावर मुक्तता केली आहे.