अभिनेता अरशद वारसीला चक्क 1 लाखांचं विजबिल, म्हणाला- ‘अदानी हायवे लुटारू’ ! नंतर ट्विट केलं Delete

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  राज्यातील वाढत्या विजबिलाचा झटका सामान्यांसोबत सेलिब्रिटींनाही बसत आहे. अलीकडेच बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनंतर मुन्नाभाईचा सर्किट म्हणजेच अभिनेता अरशद वारसी यालाही विजबिलाचा झटका बसला आहे. त्यानं ट्विट करत अदानींवर निशाणा साधला होता. अदानी इलेक्ट्रीकल्सनं तात्काळ याची दखल घेतली. यानंतर अरशदनं त्याचं ट्विट डिलीट केलं.

अरशदला भरमसाठ लाईठ बिल आल्यानंतर त्यानं ट्विट करत आपला राग व्यक्त केला होता. त्यानं ट्विट केलं की, “हायवे लुटारून अदानींकडून आलेले माझे विजबिल. 1,03,564 रुपये तुमच्या खात्यातून डेबिट झाले आहेत. इतकंच नाही तर त्यानं अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा हसतानाचा फोटोही शेअर केला होता.

आणखी एका ट्विटमध्ये अरशद म्हणाला होता की, पेंटींग विकून मला अदानींचं लाईट बिल भरायचं आहे. कृपया लोकांनी माझी पेंटींग विकत घ्यावी. म्हणजे मला पुढील वर्षाच्या विजबिलासाठीही पैसे मिळतात.

यानंतर अदानी इलेक्ट्रीसिटीकडून त्याची दखल घेतली गेली आणि त्यानं हे दोन्हीही ट्विट डिलीट केले. अदानींनी दिलेल्या प्रतिसादाचे नंतर त्यानं पुन्हा ट्विट करून आभार मानले.