आता चांगल्या कॉमेडी चित्रपटांचे दिवस ‘परत’ : आयुष्मान खुराणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ‘ड्रीमगर्ल’ या आपल्या कॉमेडी चित्रपटाला भेटलेल्या अभुतपूर्व प्रतिसादानंतर सिने अभिनेता आयुष्मान खुराणा खूप आनंदात दिसत आहे. आयुष्मान याने आता चांगल्या कॉमेडी चित्रपटांचा जमान आला असल्याचे सांगितले आहे. जितेंद्र , कादर खान आणि शक्ती कपूर या त्रिकुटाने हिंदी चित्रपट सृष्टीत कॉमेडी एका विशिष्ट स्तराला पोहचवली त्यावर डेव्हिड धवन आणि गोविंदा ने ‘सरकाय लो खटिया’ पर्यंत कॉमेडी पोहचवली. परंतु नव्या पिढीच्या दर्शकांसाठी एक नवीन उम्मीद बनलेला सिने अभिनेता आयुष्मान खुराणाने हिंदी सिनेमा कॉमेडीला तो काळ पुन्हा घेऊन येण्याचे मन बनवले आहे ज्यासाठी कधी काळी ऋषिकेश मुखर्जींचे चित्रपट ओळखले जायचे.

लोक माझ्या चित्रपटांशी जोडले जात असल्याचा आनंद
आयुष्मान खुराणा ने मुख्य भूमिका केलेल्या ड्रीम गर्ल चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४४.५७ करोड रुपये कमावले होते. आयुष्मानचा हा सलग ६ वा हिट चित्रपट ठरत आहे. आपल्या कामगिरीवर सगळीकडून होत असलेल्या वर्षावामुळे आयुष्मान चांगलाच खुश आहे. तो म्हणतो की, ड्रीमगर्ल या चित्रपटाला चित्रपट रसिकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. मला आनंद होत आहे की मी काम करत असलेल्या चित्रपटांना लोक पसंद करत आहेत तसेच ते या चित्रपटांशी जडले जात आहेत.

‘पैसे वसूल’ आणि कुटुंबासोबत पाहता येण्यासारखा कॉमेडी चित्रपट
ड्रीमगर्ल चित्रपटाबद्दल अधिक माहिती सांगताना आयुष्मान सांगतो की, हा माझ्यासाठी एक असा चित्रपट आहे जो हे दाखवून देतो की एका चांगल्या परिवाराची कॉमेडी कशा प्रकारची असू शकते. हे पाहण्यासाठी लोक आपल्या सर्व परिवाराला घेऊन जाऊ शकतात. खरं पाहिलं तर हा एक ‘पैसा वसूल’ चित्रपट आहे. या आधीचा चित्रपट आर्टिकल १५ च्या माध्यमातून लोकांना विचार करण्याचा आणि एका घटनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. आता ड्रीम गर्लच्या माध्यमातून लोकांना हसवण्याची संधी मिळाली आहे.

बॉक्स ऑफिसवर ड्रीमगर्ल ‘ड्रीम रण’ सारखीच
आधी आर्टिकल १५ आणि आता ड्रीम गर्ल आणि या नंतर बाला हे वर्ष आयुष्मानसाठी बॉक्स ऑफिसवर खूप चांगले जात आहे. याबाबत आयुष्मान सांगतो की, ड्रीम गर्लची स्क्रिप्ट अतिशय चांगल्या प्रकारे लिहिली गेली आहे. माझ्यासाठी तर डिम गर्ल बॉक्स ऑफिसवर ड्रीम रण सारखीच आहे तसेच वर्ष २०१९ माझ्यासाठी आणखी विशेष बनवत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like