Homeताज्या बातम्यादुर्दैवी ! अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनाने निधन

दुर्दैवी ! अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनाने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेल्या कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे हसतं-खेळत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. दरम्यान अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) यांची पत्नी कांदबरी कडू (वय 39) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने कडू कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

गेल्या काही दिवसांपासून कादंबरी कडू या कोरोनाशी झुंज देत होत्या. सुरुवातीला त्यांच्यावर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण कडू Bhushan Kadu यांनाही कोरोनाची बाधा झाली असून तो बोरिवलीच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे. भूषण आणि कादंबरी यांना 7 वर्षांचा प्रकीर्थ हा मुलगा आहे. कादंबरी या भूषण कडू Bhushan Kadu यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. भूषण कडू हा मराठी सिनेमांसह मराठीतील कॉमेडी शोमध्येही अभिनय केला आहे. एका टीव्ही शोमध्ये कादंबरी यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती.

Also Read This : 

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News