Actor Chandrakanth Death | अभिनेत्री ‘पवित्रा’च्या अपघाती मृत्यूने अभिनेत्याला प्रचंड मानसिक धक्का, अखेर पत्नीच्या वियोगात स्वत:ला संपविले

मुंबई : Actor Chandrakanth Death | तेलगू इंडस्ट्रीत टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता चंद्रकांत याने काल तेलंगणातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. चंद्रकांतची पत्नी आणि अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavithra Jayaram) हिचा सहा दिवसांपूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. पवित्राच्या मृत्यूचे दु:ख चंद्रकांत सहन करू शकला नाही.(Actor Chandrakanth Death)

प्रचंड मानसिक धक्क्यातून सावरता न आल्याने अवघ्या सहा दिवसात अभिनेता चंद्रकांतने आपले जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी चंद्रकांतने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट वाचून अनेकांचे डोळे पानावत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंध्र प्रदेशातील मेहबूब नगरमध्ये कारवरील नियंत्रण सुटल्याने अभिनेत्री पवित्रा हिची कार
रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. त्याच वेळी हैदराबाद येथून येणाऱ्या बसने कारच्या उजव्या बाजूला धडक मारली.
या भीषण अपघातात अभिनेत्री पवित्राचे निधन झाले.

पत्नीच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने चंद्रकांतला जबर मानसिक धक्का बसला होता. तो प्रचंड मानसिक तणावात होता.
त्याने सोशल मीडियावर आपल्या पत्नीसाठी एक भावूक पोस्ट लिहिली होती. दिवंगत पत्नीसाठी त्याने ही शेवटची पोस्ट
लिहिली होती. यानंतर पत्नीच्या मृत्यूच्या सहाव्या दिवशीच चंद्रकांतने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली.
यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

चंद्रकांतने इन्स्टाग्रामवर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो (रडणारा इमोजी)
मला एकटे सोडण्याचा विचार पचनी पडत नाही, माझी पावी (पवित्रा) आता नाही (रडणारा आणि प्रार्थना करणारा इमोजी)
प्लीज, परत ये. पापा (पवित्रा) परत ये ना…परत येत माझ्या डोळ्यातील अश्रू पुस…, असे लिहिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Raj Thackeray | मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं, राज ठाकरेंना म्हणाले ”सुपारी बहाद्दरांवर…”

Sunita Khedekar | पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सुनिता खेडेकर यांचे निधन

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘तुम्ही आमच्या गँगला दम देता का’ म्हणत दोघांवर कोयत्याने वार, दहशत पसरवणाऱ्या चार जणांना अटक

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या मुंबईतील कोणत्याही सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत : प्रकाश आंबेडकर