धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवची आत्महत्या

0
36
chandrasekhar srivastava
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह बुधवारी घरात लटकलेला अवस्थेत आढळून आला. चंद्रशेखरच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

चंद्रशेखर श्रीवास्तव एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे त्याने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. असे बोलले जात आहे की, तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. त्याच्या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत.

दरम्यान यापूर्वी दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता.