Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) Movies Live Blog | ट्रेजेडी किंग म्हणून जगप्रसिद्ध होण्यापूर्वी दिलीपकुमार (Dilip Kumar) यांनी पुण्यातील हवाई दलाच्या कँटींनमध्ये मॅनेजर म्हणून काम केले होते. या काळात त्यांना ब्रिटीश सरकारने एक दिवस येरवड्यातील कारागृहात डांबले होते. तेथे त्यांनी महात्मा गांधी यांच्या अनुयायांसोबत दिलीपकुमार (Dilip Kumar) यांनी एक रात्र घालविली होती.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘दिलीप कुमार : द सबस्टन्स अँड शेडो’ या आत्मचरित्रात हा अनुभव कथन करण्यात आला आहे. येरवडा कारागृहातील घालवावी रात्र आणि तेथे त्यांची गांधीवाला म्हणून झालेल्या ओळखीवरही भाष्य केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात दिलीप कुमार पुण्यातील हवाई दलाच्या कँटीनमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांनी भारताच्या श्रेष्ठतेबद्दल भाषण केले. कष्टकरी, सत्यवादी आणि अहिंसक लोकांचे राष्ट्र म्हणजे भारत असे त्यांनी या भाषणात वर्णन केले होते. या भाषणाने प्रभावित होत उपस्थित लोकांनी टाळ्या वाजविल्या. मात्र, त्यांचा आनंद काही वेळच टिकू शकला. त्यावेळी तेथे काही पोलीस आले. त्यांनी युसुफ खान यांना ताब्यात घेतले. कारण त्यांच्या भाषणाचा अर्थ ब्रिटीशविरोधी वक्तव्य असा लावला गेला. त्यांना अटक करुन येरवडा कारागृहात आणले. तेथे त्यांना एक सेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे सर्व सत्याग्रही यांना ठेवण्यात आले होते. काही वेळाने जेलर आला. त्यांनी सर्वांना गांधीवाला म्हणून संबोधले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हणाले की, मी ज्या सेलमध्ये होतो. तेथील सर्व कैद्यांना पोलीस गांधीवाला म्हणून संबोधित़ हा शब्द माझ्यासाठी का वापरत होते, हे मला समजू शकले नाही. दिलीपकुमार यांना त्यावेळी समजले की, स्वातंत्र्य सैनिक सरदार वल्लभभाई पटेल हे देखील त्यांच कारागृहातील एका सेलमध्ये होते. आणि हे सर्व कैदी त्यांच्याबरोबर उपोषणावर होते. त्यामुळे त्यांनाही उपवास करावा लागला. अस्वच्द प्लेटमधून आणलेले जेवण त्यांनी नाकारले. रात्री मोठी होती आणि उपासमारीच्या वेदनांनी मलाही जागे ठेवले होते, असे त्यांनी सांगितले. दुसर्‍या दिवशी लष्कराच्या अधिकार्‍यांनी येऊन त्यांची सुटका केली.

मी गांधीजींच्या अनुयायांसह तुरुंगात एक रात्र घालवली होती.
माझ्या देशाबद्दल आणि माझ्या देशबांधवांविषयी अभिमान व्यक्त करण्यापासून मी घाबरणार नाही,
अशी भावना या तुरुंगातील रात्री निर्माण झाल्याची नोंद दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे. त्यांच्या वडिलांच्या एक आर्मीतील ठेकेदार मित्राने त्यांना खडकीतील मिलटरी कँटिंनमध्ये नोकरी लावली होती.
मॅनेजर म्हणून काम करताना त्यांनी काही काळ पुण्यात फळांची विक्री करणारा स्टॉलही चालविला होता.

त्यानंतर ते मुंबई गेले आणि एक इतिहास घडला.
असे असले तरी त्यांचे पुण्याशी कायमच ऋणानुबंध जुळले.
नाशिकच्या देवळाली येथे त्यांचे शिक्षण झाल्याने त्यांचे मराठीवर उत्तम प्रभुत्व होते.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात त्यांनी स्वत:चे अनेक चित्रपट पाहिले आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (पिफ) पहिला जीवनगौरव पुरस्कार २००२ मध्ये दिलीपकुमार यांना देण्यात आला होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title :  actor dilip Kumar had spent the night in Yerawada Jail with followers of Mahatma Gandhi; He was indebted to Pune


दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास