दुःखद बातमी : अभिनेत्री दिव्या चौकसेचा कर्करोगामुळे मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे भोपाळमध्ये निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगीशी झुंज देत होती. अखरे तिची कर्करोगासोबतची झुंज संपली. दिव्याच्या निधनाची माहिती तिच्या चुलत बहिणीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की, माझी चुलत बहिण दिव्या चौकसेचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. तिने 12 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. तिने लंडनला जाऊन अभिनयाचे धडे घेतले होते. ती एक चांगली मॉडेल होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मालिकांमध्येही काम केले आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले. दिव्याने निधनापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. दिव्याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे अपना दिल तो आवारा’ या चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक मंजोय मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून दिव्या कर्करोगीशी झुंज देत होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like