बर्थ-डे स्पेशल : गोविंदा ते ‘फिल्म स्टार गोविंदा’  

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलीवूड मध्ये डान्सिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा सगळ्यांचा आवडता गोविंदा याचा आज वाढदिवस २१ डिसेंबर, १९६३ साली त्याचा विरार येथे जन्म झाला. गोविंदाचे पूर्ण नाव  गोविंदा अरुण आहुजा.आपल्या डान्समुळे आणि कॉमेडीच्या परफेक्ट टाईमिंगमुळे त्यांनी  नेहमीच प्रेक्षकांची गर्दी सिनेमागृहाकडे खेचून आणली.

गोविंदा याचे वडिल अरूण कुमार हे चित्रपट निर्माते होते आणि त्यांची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका  होत्या त्यांच्या  वडिलांनी एक चित्रपटाची निर्मिती केली तो चित्रपट चालला नाही त्यामुळे त्यांना नुकसान झाले. चित्रपटात नुकसान झाल्यामुळे गोविंदाचे वडील आजारी राहू लागले. त्‍यांनी आपला कार्टर रोड येथील बंगला सोडून कुटुंबासह ते विरार येथे स्‍थायिक झाले. येथेच, गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा हा सहा भावंडांमध्ये सर्वात लहान प्रेमाने त्याला ‘ची ची’ म्हणायचे

Image result for फिल्म स्टार गोविंदा'

गोविंदाने वसई कॉलेज मधून आपले पदवी शिक्षण घेतले. त्‍यानंतर त्‍याच्‍या वडिलांनी चित्रपटात करिअर करण्‍याचा सल्‍ला दिला. पुढे चित्रपटांमध्‍ये करिअर बनवण्‍यासाठी गोविंदाने ‘डिस्को डान्‍सर’ चित्रपट पाहिला आणि तासनतास त्‍यातील डान्‍स मुव्‍ह्‍ज प्रॅक्टिस करून एक व्‍हिडिओ कॅसेट तयार केला. सुरुवातीला गोविंदाने एक जाहिरातीत काम केले. पुढे आनंद यांनी दिग्‍दर्शन केलेल्‍या चित्रपटामध्‍ये त्‍याला मुख्य भूमिका मिळाली. (आनंद हे गोविंदाचे काका)

गोविंदाने आपल्‍या चित्रपट करिअरची सुरुवात १९८६ मध्‍ये आलेला चित्रपट ‘इल्जाम’मधून केली. या चित्रपटात त्‍याच्‍यावर चित्रित करण्‍यात आलेले गाणे स्‍ट्रीट डान्‍सर लोकप्रिय ठरले. तेव्हा पासून त्याने १६५ पेक्षा अधिक चित्रपटात काम  केले आहे.उंचीने कमी आहे, हिल्‍सचे बूट घालून त्‍याची उंची वाढवली जाते म्‍हणून सुरुवातीला त्‍याला हिणवले गेले. टीका झाली म्‍हणून त्‍याने हार मानली नाही. तो प्रयत्‍न करत राहिला आणि त्‍याला यश मिळत राहिले.हत्‍या’ चित्रपटात त्‍याचा जबरदस्‍त अभिनय सगळ्यांनी पसंत केला.

Image result for फिल्म स्टार गोविंदा'

विनोदी भूमिकांबरोबर त्याने भावुक आणि रोमँटिक हिरोच्या भूमिका केल्या  इतक्‍या वर्षांच्‍या रुपेरी पडद्‍यावर त्‍याने अनेक वेगवेगळ्‍या भूमिका साकारल्‍या. ‘नसीब,’ ‘राजा बाबू,’ ‘कुली नंबर १,’ ‘साजन चले ससुराल,’ ‘हिरो नंबर १,’ ‘दुल्‍हे राजा,’ ‘स्‍वर्ग,’ ‘ऑन्‍टी नंबर १,’ ‘बडे मिया,’ ‘छोटे मिया,’ ‘जिस देश मे गंगा रहता है’ असे एकापेक्षा एक चित्रपट गोविंदाने बॉलिवूडला दिले. गोविंदाने करिष्मा कपूर , नीलम आणि रवीना टंडन यांच्या बरोबर दहा -दहा चित्रपट केले.
त्यांच्या बऱ्याच चित्रपटाच्या नावामध्ये  नं 1 असायचे त्यामुळे त्यांचे दुसरे नाव नं वन पडले हद कर दी आपने या चित्रपटात त्यांनी सहा भूमिका केल्या आहे.

 या शिवाय गोविंदाआणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी मिळून अनेक हिट चित्रपट दिले. गोविंदाने इतर कलाकारांसोबत म्हणजे शक्ती कपूर यांच्या बरोबर ४२ चित्रपट तर कादर खान यांच्या सोबत ४१ चित्रपट केले. गोविंदाला  बॉलिवूडचे जेष्ठ अभनेते धर्मेंद्र आवडतात.

Image result for फिल्म स्टार गोविंदा'

शोला और शबनम (१९९२),आँखे (१९९३),  खुद्दार (१९९४),  छोटे सरकार (१९९६),नसीब (१९९७),एक और एक ग्यारह (२००३) हे काही गोविंदाचे  सुपरहिट  चित्रपट आहे . गोविंदाला आँखे (१९९३), राजा बाबू (१९९४),हसीना मान जायेगी (१९९९)या चित्रपटासाठी फिल्म फेअर बेस्ट कॉमेडी अवॉर्डमिळाला होता.