मुंबई : अभिनेता Hrithik Roshan ला मुंबई गुन्हे शाखेचे समन्स

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि हृतिक रोशन या दोघांमधील ई मेलच्या देवाण घेवाण प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या तपासासाठी अभिनेता हृतिक रोशन यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. हृतिक याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी उद्या शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी गुन्हे अन्वेषण विभागासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यातील वाद गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. तनु वेड्स मनु या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हृतिक रोशनला कंगना रणौत हिने त्रास दिल्याचा आरोप केला होता. २०१६ मधील या प्रकरणात कंगना हिने आपल्याला ई मेल करुन त्रास दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आपले म्हणणे नोंदविण्यासाठी गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटने शनिवारी हृतिक रोशनला बोलावले आहे. रोशन याचे म्हणणे नोंदविल्यानंतर पोलीस कंगना रणौत हिचेही म्हणणे नोंदवून घेणार आहे.