अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक बिघडली, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार सुरू !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खानची तब्येत अचानक खराब झाली आहे. इरफान खानला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या इरफान आयसीयुमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अद्याप इरफान खानला नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या मात्र त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानला गेल्या आठवड्यातच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायचं होतं परंतु कोरोनामुळं हे शक्य झालं नव्हतं.

2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. याबाबत खुद्द इरफाननं माहिती दिली होती. यानंतर तो लंडनला गेला होता. एका वर्षांनं तो भरतात परत आला होता. यानंतर त्यानं अंग्रेजी मीडियम हा सिनेमाही शुट केला. काह दिवसांपूर्वीच त्याची आई सईदा बेगमचं निधन झालं होतं. त्यावेळी तो अपसेट होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगनं त्यानं आईचं शेवटचं दर्शन घेतलं होतं.