एका सिनेमातच रातोरात ‘स्टार’ झालेली ‘ही’ अभिनेत्री जगत आहे ‘असं’ आयुष्य, वाचून थक्क व्हाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एके काळी शानदार जीवन जगत होते परंतु आजच्या काळात मात्र ते विस्कलेले जीवन जगत आहेत. अशाच एका अ‍ॅक्ट्रेसबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या अ‍ॅक्ट्रेसबद्दल बोलत त्या आहेत. अनु अग्रवाल. ज्या रातोरात स्टार बनलेल्या अ‍ॅक्ट्रेस आहे. परंतु आता मात्र त्या सर्व काही हरवल्यासारखं आयुष्य जगत आहे.

image.png

अनु अग्रवाल रातोरात बनल्या स्टार

तुम्हाला सांगू इच्छितो की, महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आशिकी इतका गाजला की, लोकांनी अनु अग्रवालला रातोरात स्टार बनवले. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की आता त्या कोठे रहात आहेत. कशा प्रकारे आपलं आयुष्य जगत आहेत ?
image.png

पहिल्या सिनेमानंतर मिळाले नाही सिनेमात काम

आजच्या काळात अनु अग्रवाल फिल्मी दुनियेपासून खूपच दूर बिहार मधील मुंगेर येथे आपलं आयुष्य जगत आहेत. एके काळी आपल्या सौंदर्याने बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची विचारपूस करणारा आजच्या काळात एकही माणूस दिसत नाही. अनु अग्रवाल यांना पहिल्या सिनेमाच्या यशानंतर जवळपास 9 वर्षांपर्यंत कोणत्याही सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही.
image.png

अ‍ॅक्सिडेंटनंतर बदलून गेलं आयुष्य

अनु अग्रवाल यांचं आयुष्य तेव्हा पूर्णपणे बदलून गेलं जेव्हा 1999 मध्ये त्यांचा अ‍ॅक्सिडेंट झाला. यानंतर त्यांच्या आयुष्याने एकदम पलटी खाल्ली. कारण या अपघातात अनु अग्रवाल यांनी फक्त आपली स्मरणशक्ती तर गमावलीच परंतु 29 दिवस त्या कोमात होत्या.
image.png

त्या गोष्टीमुळे महेश भट्टही चकित झाले

जेव्हा अनु अग्रवाल या अपघातातून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी ठरवले की, त्या या अपघाताबद्दल पूर्ण जगाला सांगणार. स्वत:ला स्वत:शी भेटवण्यासाठी त्यांनी आत्मकथा लिहायला सुरुवात केली. अनु यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी महेश भट्टही तेथे उपस्थित होते. त्यांनी अनु यांचं कौतुक करत म्हटले होते की, “ही मुलगी मृत्यूच्या जबड्यातून परत आली आहे. मला चकित करणारी गोष्ट ही आहे की, अशा कठिण काळातून जात असतानाही तिने आपल्या आयुष्याला इतके सुंदर वळण कसेकाय दिले.”
image.png

अनु अग्रवाल आजही आहेत अविवाहित

अनु अग्रवाल यांनी कोणाशीही लग्न केलं नाही. आता तर त्या एकट्याच बिहार मधील मुंगेर गावात आपलं आयुष्य जगत आहेत. आता त्या बिहारमधील लोकांना योगा शिकवतात. यासोबतच त्या अनु पावर लिफ्टरही राहिल्या आहेत. त्यांनी अनेक पावर लिफ्टर कॉम्पिटिशनमध्ये भागही घेतला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

शाळांमध्ये लागणार तंबाखूविरोधी फलक

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

Loading...
You might also like