…म्हणून अभिनेता इशान खट्टरला भरावा लागला ‘एवढा’ दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद कपूरचा भाऊ बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. इशानने ट्राफिक नियम मोडले आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली म्हणून इशान खट्टर चर्चेत आला आहे. मुंबईतील वांद्रे इथे इशानने ट्रफिक नियमांचे उल्लघंन केले त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर कारवाई केली. धडक या चित्रपटातून इशानने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे.

इशान खट्टर वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी त्याने आपली बाईक नो पार्किंगमध्ये लावली होती. त्यामुळे पोलीस त्याच्या बाईकला टो करत होते. इशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडला तेव्हा त्याला हे दृश्य दिसले. यानंतर तो धावतच बाईकपाशी गेला आणि विनंती करू लागली. बॉलिवूड स्टार असला तरी पोलिसांनी इशान सुट्टी दिली नाही. नियम हे सर्वांसाठी सारखे असतात हे पोलिसांनी दाखवून दिले. अखेर इशानकडून पोलिसांनी दंड वसूल केला. नंतरच त्याची बाईक त्याच्या स्वाधीन केली. नो पार्किंगमध्ये पार्किंग केल्याबद्दल पोलिसांनी इशानकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान सारा अली खानचाही वाहतुकीचा नियम तोडल्याचा प्रसंग समोर आला होता. वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्या बद्दल दिल्ली पोलिसांनी साराला नोटीस बजावली होती. तिने हेल्मेट न घालता बाईक चालवली होती. तिचा विमा हेल्मेट बाईक चालवतानाचा व्हिडीओ सोशलवर व्हायरलदेखील झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती.

You might also like