‘या’ अभिनेत्यानं केली मॉडलला ‘बेदम’ मारहाण, तिच्या कानाचा पडदाच फाटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदौरमधील एका अभिनेत्यावर त्याच्या मॉडल पत्नीने आरोप लावला आहे की पतीने हुंड्यासाठी तिला मारहाण केली ज्याने तिच्या कानचा पडदा फाटला. एवढेच नाही तर मारहाण करुन पतीने तिला सोडून दिले. पिडीत मॉडल स्वाति मेहरा ही 30 वर्षीय आहे, जी पेशाने मॉडल आहे. पोलिसांच्या तक्रारीनुसार स्वातिने आरोप केला आहे की सुदामा नगर भागात राहणाऱ्या पती कर्ण शास्त्रीने 13 फेब्रुवारी 2019 मध्ये तिच्याशी प्रेम विवाह केला होता.

दोघांची भेट जून 2018 साली मुंबईत एका फिल्मच्या शूटिंग दरम्यान झाली. या सिनेमात कर्ण मुख्य भूमिकेत होता. मैत्री झाल्यानंतर त्याचे मैत्रीचे नाते प्रेमात रुपांतरीत झाले. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात कर्णने तिच्याकडे पैशांची मागणी आहे.

स्वातिचा आरोप आहे की कर्णने तिला अनेकदा मारहाण केली, ज्यामुळे तिच्या कानाचा पडदा फाटला. स्वातिने मुंबईच्या गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेत द्वारकापुरी स्टेशनला वर्ग केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

तर अभिनेता कर्णचे म्हणणे आहे की स्वाति माझ्यापासून वेगळी राहते. निर्णय आम्ही दोघांना सहमतीने घेतला आहे. मी आजपर्यंत तिच्यावर हात उचललेला नाही. तीच माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुटूंबाची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे.

Visit : Policenama.com