‘सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय’ ! ‘या’ अभिनेत्याचा मुख्यमंत्र्यांकडे ‘माफीनामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या असून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या 122 वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण पावलं उचलत आहेत. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने कोरोनाबाबत निर्णय घेत आहेत आणि काम करत आहेत, हे पाहून टीका करणाऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी ज्या अभिनेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याच अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांची माफी मागितली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10220073046444022&id=1460418198

अभिनेते किरण माने यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. किरण माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात, स्वॉरी उद्धवजी… मी किरण माने मला तुमची माफी मागायची. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहून खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता… ताटाखालचं मांजर म्हणायचो… भाजपसोबत झालेली तुमची फरपट पाहून ‘शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला’ अस माला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत.
अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी आपल्या फेसबुक वर टाकली आहे. किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी देखील त्यांच्या पोस्टला कमेंट्स करत आहेत. सध्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. यामध्ये सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत आहेत. तसेच त्यांच्या कामाची प्रशंसा करताना पहायला मिळत आहे.

You might also like