बायोपिकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था – निवडणुकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. राजकीय नेत्यांवर विविध चित्रपट बनत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनत असतानाच त्यांच्यावर वेबसीरिजही येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक नंतर आता त्यांच्या आयुष्यावर वेबसीरीजही बनवली जाणार आहे . इरॉस नाऊ’नं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासावर ‘मोदी’ ही दहा भागांची वेबसीरीज प्रदर्शित करणार आहे. ‘ गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या वेबसीरीजमधून उलगडला जाणार आहे . माय गॉड’ ‘102 नॉट आऊट’चे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत . येत्या एप्रिलमध्ये ही वेबसीरीज ‘इरॉस नाऊ’वर प्रदर्शित केली जाणार आहे. गुजरातमध्ये या वेब सीरीजचं शूटिंग पार पडलं आहे.

पंतप्रधान मोदींवर बनत आसलेल्या या वेब सीरीजचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या वेब सीरीजचा पहिला लुक ट्विटरवर शेअर करत या वेबसीरीजची घोषणा केली असून, यात अभिनेता महेश ठाकूर मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता महेश ठाकूरने तू तू मै मै, शरारत, ससुराल गेंदा फूल, बिदाई, इश्कबाज यासारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्याशिवाय हम साथ साथ है, आशिकी 2, जय हो यासारख्या सिनेमातही तो झळकला होता.

या वेब सीरीजचं सर्व शूटिंग गुजरात मध्ये पार पडलं असून यातून मोदींच्या स्वभावातील माहीत नसलेले पैलू उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्य अभिनेता महेश ठाकूरनं सांगितलं.