गेल्या महिन्याभरापासून हिमालयात अडकलाय अभिनेता मनोज वाजपेयी, डॉक्टरांनी केली तिथं जाऊन तपासणी !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेता मनोज वाजपेयी एका महिन्यापासून लॉकडाऊनमुळं हिमालयाच्या खोऱ्यात अडकला आहे. त्याच्या सोबत 23 सदस्य होते जे वेब सीरिजची शुटींग करण्यासाठी गेले होते. बुधवारी (दि22 एप्रिल) डॉक्टरांची टीम तिथं हे चेक करण्यासाठी गेली होती की, तिथे कोरोनाचं संक्रमण तर झालं नाही ना.

https://twitter.com/30Kumaar/status/1253273070061658112

बॉलिवूड स्टार मनोज वाजयेपी, नीना गुप्ता, दीपिक डोबरियाल सहित त्यांच्या 23 सदस्यांची टीम नैनीतालच्या रामगढ सोनापानी स्टेटमध्ये जवळपास एका महिन्यापासून अडकली आहे. बुधवारी(दि 22 एप्रिल) नैनीतालला गेलेल्या डॉक्टरांच्या टीमनं या सर्व लाकोंची आरोग्य चाचणी केली.

https://twitter.com/30Kumaar/status/1253273144334462976

मनोज वाजपेयीनं तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की, आम्ही खूप आधीच इथं आलो आहोत त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाची आशंका नाही. कोणतीही कोरोनाची लक्षणं आढळणार नाही. आम्ही शुटींगसाठी आलो होतो. परंतु आता इथं अडकलो आहोत. परंतु चांगल्या ठिकाणी अडकलो आहोत. हिमालयासमोर एकदम छान वाटत आहे. आरोग्य विभागाची टीम खूप चांगलं काम करत आहे. मी त्यांना सेल्यूट करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.

https://twitter.com/30Kumaar/status/1253273244959997952

ओमकारा फेम अभिनेता दीपक डोबरियालनं सांगितलं, डॉक्टर चेतन आणि डॉक्टर प्रदीप आणि त्यांच्या टीमनं त्यांची आणि सीरिजच्या टीमची तपासणी केली आहे. खूप प्रेमानं आणि विश्वासानं टेस्ट केल्या असून आम्ही खूप खुश आहोत. सुरुवातील थोडी भीती वाटली होती.

https://twitter.com/30Kumaar/status/1253273312811274240

https://twitter.com/30Kumaar/status/1253273383179104256

https://twitter.com/30Kumaar/status/1253273457082720258