‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमननं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा ‘NUDE’ फोटो ! 25 वर्षांपूर्वीच यावरून झाला होता प्रचंड वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता मिलिंद सोमननं इंस्टाग्रामवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती. त्यानं गर्लफ्रेंड सोबत न्यूड फोटोशुट केल्यानं तो वादातही सापडला होता. त्यानं त्याील एक एक न्यूड फोटो शेअर केला आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा फोटो 25 वर्षांपूर्वीचा आहे. यात त्याची गर्लफ्रेंडही न्यूड आहे.

मिलिंद आणि त्याची गर्लफ्रेंड मधु सप्रे यांनी 1995 मध्ये एक फोटोशुट केलं होतं. एका जाहिरातीसाठी केलेल्या या शुटमध्ये मिलिंद आणि मधु दोघेही न्यूड आहेत. दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं आहे आणि त्यांच्या गळ्यात एक अजगरही दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोनं सध्या सोशलवर खळबळ उडाली आहे.

फोटो शेअर करताना मिलिंद म्हणतो, “25 वर्षांपूर्वीचा हा फोटो त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं. मला जाणून घ्यायला आवडेल की हा फोटो आज शेअर केला तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत.” मिलिंदच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. बहुतेकांनी त्याच्या 25 वर्षांपूर्वीच्या या धाडसाचं कौतुक केलं आहे. हे असं धाडस करणारा तो एकमेव पुरुष मॉडेल होता असंच अनेकांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही मिलिंदनं त्याचाच एक न्यूड फोटो शेअर केला आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसली होती. यात तो एकटाच दिसत होता.