Actor Mithun Chakraborty । ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी

कोलकाता : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections West Bengal) दरम्यान स्टार अभिनेता आणि भाजपाचे नेते मिथुन चक्रवर्ती (Actor Mithun Chakraborty) यांनी एक वादग्रस्त भाषण (Controversial speech) केलं होतं. या प्रकरणावरून मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची आज (16 जून ) कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि अवैधानिक विधान केलं होतं. त्यावेळी वादग्रस्त भाषण केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून आज पोलिसांकडून मिथुन यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी केली. मिथुन (Mithun Chakraborty) यांची व्हर्च्युअल पद्धतीनं चौकशी करण्यात आल्याचे समजते. (Actor Mithun Chakraborty’s alleged controversial speech)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Actor Mithun Chakraborty) यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआर (FIR) विरोधात कोलकाता हाय कोर्टात धाव घेतली. एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हाय कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरून उच्च न्यायालयाने मिथुन चक्रवर्ती यांना त्यावेळी त्यांचा ई-मेल राज्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता. कारण सदर प्रकरणाची चौकशीसाठी चक्रवर्ती हे व्हर्च्युइली सहभागी होऊ शकतील. तसेच, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपली बाजू मांडताना एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करत त्या भाषणावेळी आपण केवळ चित्रपटातील संवादच म्हटले असल्याची सारवासारव केल्याचं समजते.

नेमका प्रकार काय आहे ?

पश्चिम बंगाल (West Bengal) निवडणुकीच्या दरम्य़ान, अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यावर वादग्रस्त भाषण केल्याचे आरोप लावत तेथील मानिकतल्ला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला होता. कारण मिथुन चक्रवर्ती यांनी (7 मार्च) रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (तुमचा खात्मा केल्यास मृतदेह स्मशानात जातील) आणि ‘ एक छोबोले चाबी’ (सर्पदंशानंच तुम्ही छायाचित्रात कैद व्हाल) अशी वक्तव्य त्यांनी केली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : actor mithun chakraborty bjp leader kolkata cops question over bengal election 2021 controversial speech

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..