‘हा’ अभिनेता साकारणार अनोखी भूमिका, ‘या’ मालिकेतून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

मुंबई : वृत्तसंस्था – चायना गेट ,गंगाजल ,गोलमाल ,बॉलिवूडच्या अशा अनेक चित्रपटात कॉमेडी आणि खलनायकाची भूमिका साकारल्यावर अभिनेता मुकेश तिवारी एका मालिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बँड बाजा बंद दरवाजा’ या सोनी सब वरील नवीन मालिकेत तो संजीव शर्मा नामक भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. ही हॉरर कॉमेडी मालिका असणार आहे.
बँड बाजा बंद दरवाजा’ ही संजीव शर्माची कथा आहे. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्‍या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्‍टीचा बदला घेण्‍यासाठी परत येतो आणि त्‍यांच्‍या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्‍याने तो एकाकी जीवन जगतो. त्‍याची इच्‍छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्‍याच्‍यासारखेच जीवन जगावे.
या भूमिकेबाबत मुकेश तिवारी म्‍हणाला, ‘मी सोनी सबवरील मालिका ‘बँड बाजा बंद दरवाजा’मध्‍ये हॉरर-कॉमेडी शैली सादर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. एक अभिनेता म्‍हणून मी विविध शैलींच्‍या भूमिका साकारण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. म्‍हणूनच ही मालिका स्‍वीकारताना मी अधिक विचार केला नाही. मी या नवीन विनोदी मालिकेसह दर्शकांचे मनोरंजन करण्‍यास उत्‍सुक आहे.’मुकेश तिवारी भूताच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

सर्वोत्‍तम कलाकार व लक्षवेधक पटकथेसह बँड बाजा बंद दरवाजा लवकरच २०१९ मध्‍ये सोनी सबवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.