अभिनेता प्रभासच्या ‘साहो’तील गाण्याचा ‘फर्स्ट’ लुक ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा साहोचा टीजर लाँच झाला होता. या सिनेमातील गाण्याचा पहिला लुक समोर आला आहे. प्रभासने स्वत: हा लुक शेअर केला आहे. प्रभासने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गाण्याचे पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहे. प्रभासची ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रभासने शेअर केलेल्या फोटोत तो स्वत: आणि दुसऱ्या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर दिसत आहे. साहो मधील गाण्यातील दोघांचा हा लुक आहे. सायको सय्या असं या गाण्याचं नाव आहे. गाण्याचे पोस्टर शेअर करताना प्रभासने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये प्रभास म्हणतो की, “Hey darlings… It’s time for the First Song of SAAHO… The teaser of “The Psycho Saiyaan” will be out soon..” पोस्टरमध्ये प्रभास काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके लुकमध्ये दिसत आहे. तर श्रद्धाने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यात ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

प्रभासची ही पोस्ट शेअर करून एक दिवसही पूर्ण झाला नाही. तोच ही पोस्ट ६ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. अनेकांनी प्रभासच्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या लुकचे कौतुक केले आहे. अनेकांनी प्रभास शुभेच्छा दिल्या आहेत आणि गाण्याची वाट पहात आहोत असे सांगितले आहे.

Saaho Official Teaser : Telugu | Prabhas | Shraddha Kapoor | Sujeeth | UV Creations | #SaahoTeaser

Darlings, #SaahoTeaser is out now. Hope you all enjoy it. Experience it in theatres from tomorrow! #TeluguTeaser‬‪SAAHO in theatres from 15th August!‬#SaahoTeaser Shraddha Kapoor Neil Nitin Mukesh Sujeeth UV Creations T-Series #15AugWithSaaho

Geplaatst door Prabhas op Woensdag 12 juni 2019

१३ जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाच्या टीजरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. १५ ऑगस्ट २०१९ रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

गुलशन कुमार यांच्या टी सीरीज आणि भूषण कुमार आणि युवी क्रिएशन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या साहोचे सुजीत दिग्दर्शन करत आहेत. वामसी, प्रमोद आणि विक्रम या सिनेमाची निर्मिती करत आहेत. बाहुबली सिनेमानंतर प्रभासचा हा दुसरा सिनेमा आहे. ज्याची पूर्ण देशभर प्रतिक्षा केली जात आहे. कारण या सिनेमात प्रभासचा एक वेगळाच अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. याशिवाय प्रभास पहिल्यांदाच श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

Loading...
You might also like