अभिनेते प्रकाश राज यांचा PM मोदींवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले – ‘आता चांगली दाढी करा अन् करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, या ठिकाणी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करताना भाजपने 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. परंतु दुसरीकडे मतदारांनी तृणमूल काँग्रेसलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपने जोर लावला होता. भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ताही कायम राहणार आहे. दरम्यान, यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी टोला लगाला आहे. डन अँड डस्टेड प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवण थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटले आहे की, चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा. जीवन महत्त्वाचे आहे, असे म्हणत राज यांनी मोदी यांना टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. यामुळे भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी बंगाल काबीज करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र भंगले आहे. सध्याच्या कलानुसार येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु अवघ्या देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागले होते. त्यातही ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या नंदीग्राम जागेवर अनेकाचे लक्ष होते. दरम्यान येथे ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावे लागणार आहे.