‘लॉकडाऊन’मध्ये लोकांची मदत करताना खालावली अभिनेता प्रकाश राजची आर्थिक स्थिती ! ट्विट करत सांगितलं ‘दु:ख’

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार पुढे आपले ज्यांनी सिनवर्कर्सची मदत केली. जशी काहींनी मदत केली तसेच काही कलाकार मात्र अडचणीत सापडले आहेत. अॅक्टर प्रकाश राज याच्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे. प्रकाश राजनं इतरांना मदत केली परंतु आता त्याचीच आर्थिक स्थिती खराब झाल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्याच्यावर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. ट्विट करत त्यानं आपलं दु:ख मांडलं आहे.

प्रकाश राज सतत आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांची मदत करत आहे. अलीकडेच प्रकाश राज ट्विट करत म्हणाला, ” माझे आर्थिक स्त्रोत घटत आहेत. परंतु आम्ही लोन घेऊन लोकांची मदत करणार आहोत. कारण मला माहिती आहे की, मी पुन्हा कमाई करू शकतो. जर मानवता जिवंत राहिली तर. चला सोबत मिळून लढू या. पुन्हा आयुष्याकडे वळूयात.”

प्रकाश राजच्या या ट्विटवर खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या फाऊंडेशनकडून केल्या जाणाऱ्या कामाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला प्रोत्साहन आणि दिलासा देण्याचं काम केलं आहे. प्रकाश राजचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.