नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारे ‘मुकद्दर या पुस्तकाचे लेखक स्वप्नील रामदास कोलते (वय 33 रा. कोरेगाव मूळ ता. हवेली) यांचा मंगळवारी (दि. 26) रात्री अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर स्वप्नीलविषयी एक पोस्ट लिहिली आहे. नियतीचा पुन्हा क्रुर घाला… स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला अशी भावूक पोस्ट तरडे यांनी लिहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

प्रवीण तरडे यांनी फेसबुक अकाऊंटवर लिहले आहे की, नियतीचा पुन्हा क्रुर घाला… स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला तुझ्या अप्रतिम लेखनासाठी व्हिडिओ बाईट दिला.. मुक्कदर वाचुन तुझे कौतुक उभा महाराष्ट्राला अजुन करायच होते रे… तू सध्या शंभुराजांवर शेरे दख्खन लिहीत होतास.. इतिहासावर दोन्ही छत्रपतींवर भरभरून बोलणारा, लिहणारा तरूण लेखक गेला.. मित्रा भावपूर्ण श्रध्दांजली.

स्वप्नील कोलते मंगळवारी (दि. 26) रात्री शिरुरहून घरी परतत होते. पुणे-सोलापूर महामार्गावर स्वप्नील यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. या प्रकरणी बाबासाहेब कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.