मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील मध्यप्रदेशातील एका खेडेगावात जन्माला आलेल्या रजनीश तथा ओशो यांचे भक्त सा-या जगभर पसरले आहेत. ध्यानाचे महत्व समजावून सांगत मानवी जीवन सुकर करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. जगप्रसिध्द आध्यात्मिक विचारवंत म्हणून प्रसिध्द झाले आहेत. त्याकाळी त्यांच्या या विचारांना कमालीचा विरोध सहन करावा लागला. त्यांना धमकावण्याचेही प्रकार झाले. मात्र ओशो काही मागे हटले नाहीत. त्यांनी त्यांचे काम सुरु ठेवले. आपल्या बंडखोर विचारांनी समाजाला दिशा देण्याचे काम ओशो यांनी केले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असे बोलले जात होते. दिग्दर्शक शकुन बत्रा या चित्रपटाची कल्पना मांडली होती. निर्मिती करण जोहर करणार होता. या चित्रपटात आमिर खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा देखील झाली होती. त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ओशोंच्या आयुष्यावर लवकरच चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ओशोंच्या प्रमुख भूमिकेसाठी प्रसिध्द अभिनेता आमिर खान याचे नाव चर्चेत होते. मात्र आता ती भूमिका रवी किशन साकारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सनं आचार्य रजनीश यांच्यावर एका माहितीपटाची निर्मिती केली आहे. तो माहितीपटही वादाच्या भोव-यात सापडला होता.

अभिनेता रवी किशननं ओशोची भूमिका स्वीकारल्याचे कळते आहे. आमिर खानच्या आधी रवी किशन आता वेलजी भाई गाला निर्मित ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’ मध्ये ओशो रजनीशच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषय़ी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वेलजीभाई म्हणाले की, मी ओशोंचा शिष्य आहे. ३० वर्षांपासून मी त्यांच्या विचारांचा अभ्यास करतो आहे. शक्य तितक्या लवकर त्यांची कथा लोकांपर्यंत पोहचवायची होती. बर्‍याच विचारानंतर त्यांची कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असे मला वाटले. म्हणून मी हा निर्णय घेतला. मी त्यांचे अनेक प्रवचन ऐकले आहेत, त्यांनी सांगितलेली ध्यानधारणा केली आहे. मला त्याच्याशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टीची जाणीव आहे, म्हणून चित्रपट तयार करण्यात मला फारशी अडचण नव्हती. कॉपीराइटमुळे त्यांनी ओशोचे नाव चित्रपटाच्या शीर्षकात नमूद केलेले नाही.

जयेश कपूर, विवेक मिश्रा आणि रवि किशन यांनी या भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा ओशो रजनीश अमेरिकेत गेले होते तेथे त्यांना विषबाधा झाली होती, रवी किशन त्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. रवीला साइन करण्यापूर्वी आम्ही काही कलाकारांच्या लूक टेस्ट केल्या, मात्र ओशोच्या व्यक्तिरेखेत रवीपेक्षा इतर कुणीही योग्य वाटले नाही. हा चित्रपट मे २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण काशी, गुजरात, गोवा, जबलपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये केले गेले आहे. ओशो या शतकातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहेत आणि या शतकाच्या लोकांना त्यांच्याबद्दल माहित असले पाहिजे, असे वेलजी यांना वाटते. रवी किशनविषयी त्यांनी सांगितले की, या चित्रपटात आम्ही ओशोशी संबंधित तीन मोठे टप्पे दाखवणार आहोत, ज्यासाठी तीन वेगवेगळ्या कलाकारांना घेण्यात आले आहे.