ज्यांच्या वडीलांनी भारतावर बॉम्ब टाकले त्यांना ‘नागरिकत्व’, मग बाकीच्यांना का नाही ?, अभिनेते रजा मुराद यांचा ‘सवाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार रजा मुराद आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, ते प्रत्येक मुद्यावर आपला पक्ष मांडतात. आता त्यांना नागरिकत्व संशोधन कायद्यावर भाष्य केले आहे. रजा म्हणाले की जर गायक अदनान सामी यांना नागरिकत्व मिळू शकते तर बाकी लोकांना का मिळू शकतं नाही?

काय म्हणाले रजा मुराद –
रजा मुराद म्हणाले की हा कायदा आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यायला हवा. अदनाना सामी यांना नागरिकत्व मिळू शकते तर इतरांना का नाही. त्यांच्या वडीलांनी तर आमच्यावर 1965 च्या युद्धात बॉम्ब हल्ले केले होते.

अदनानला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. सीएए वर अदनान यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की सीएए त्या धर्माच्या लोकांसाठी आहे ते धर्माशासित देशात त्रास देण्यात येतो. मुस्लिम लोकांना पाकिस्तान, बांग्लादेश किंवा अफगाणिस्तान या देशात समस्या झेलावी लागत नाही, कारण ते तेथे बहुसंख्य आहेत. मुस्लिम समुदाय आज देखील भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात, कायदेशीर पद्धतीने सर्वांचे स्वागत आहे.

नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसी संबंधित देशभर चर्चा सुरु आहे. देशातील अनेक भागात लोक शांततेत प्रदर्शन करत आहेत. अनेक राज्यातून हिंसक आंदोनलाच्या बातम्या आल्या. यावर बॉलिवूड कलाकारांनी आपली बाजू जोरदार मांडली. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया न देणंच पसंत केलं.

विक्की कौशल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांनी जमियामध्ये पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसेवर दुख व्यक्त केले. अनुराग कश्यप, स्वरा भास्कर,जावेद जाफरी, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी, फरहान अख्तर आणि अली फजल यांनी देखील टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like