ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी नितू सिंग होत्या. पण आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांचे निधन झाल्याचे ट्वीट करून सांगितले आहे.

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्याच्यावरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते मुंबईला परत आले होते. त्यांना आता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रात्री रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. आता त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.