सिनेमात ‘निगेटिव्ह’ रोल निवडण्याबाबत काय म्हणतो रितेश देशमुख ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रितेश देशमुखनं 2014 साली आलेल्या एक व्हिलन सिनेमात निगेटीव्ह रोल करू सर्वांनाच चकित केलं होतं. त्यानं गेल्या वर्षी आलेल्या मरजावां सिनेमातही निगेटीव्ह रोल केला होता. आता खलनायकाच्या भूमिका निवडण्याबद्दल रितेशनं भाष्य केलं आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रितेश म्हणाला, “आयुष्याचं सार चांगलं आणि सकारात्मक बनणं आहे. मला अनकेदा अशी जाणीव झाली की, काही गोष्टींना घेऊन आपण अनेकदा नकारात्मक होतो. आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत. कधी आपल्याला एखादा माणूस आवडत नाही. कधी कोणाला बुक्का मारण्याचं मन करतं. काहींना तोंड पुन्हा पाहुशी वाटत नाही. कोणाचा खून करणं तर तिरस्काराची हाय लेवल आहे.”

पुढे बोलताना रितेश म्हणतो, “मला एवढंच सांगायचं आहे की, या साऱ्या भावना आपल्या आतच आहेत. आपल्याला प्रेम, हास्य, करुणा, तिरस्कार याची जाणीव असते. असं सगळं असतानाही आपल्या शिक्षण आणि पालन पोषणामुळं आपल्याला समजतं की, काय चांगलं आणि काय वाईट आहे.”

रिेतेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तो मरजावां सिनेमात दिसला होता. यानंतर आता तो लवकरच बागी 3 सिनेमात टायगर श्रॉफसोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय तो अक्षय कुमारसोबत हाऊसफुल 4 मध्येही दिसला होता.