सलमान खानच्या बिइंग ह्युमनच्या सीईओची ‘त्या’ मॉडलला बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानचा पार्टनर आणि बीइंग ह्यूमनचे सीईओ मनीष मंधाना यांनी एका मॉडलला मारहान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मॉडेल एंड्रिया डिसूजाने मारहाणीचा आरोप करत मुंबईतील गामदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनीषने तिला केलेल्या मारहाणीमुळे तिची ऐकण्‍याची क्षमता कमी झाली आहे, असं तिचे मत आहे.

मनीषला ती ३ वर्षांपूर्वी दुबईत भेटली होती. तेव्हा मनीष तेथे सलमानचे बीइंग ह्यूमन क्लोथिंग स्टोर सुरू करण्‍यासाठी आला होता. त्यावेळी दोघांची मैत्री झाली होती. मनीष विवाहित असल्याचे तिला माहिती होते. तो आपल्‍या पत्‍नीला घटस्‍फोट देणार आहे, असं त्याने तिला सांगितलं होते. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुले वेगळी राहतात. मनीषने खोटे सांगितल्याचे तिला नंतर समजले, असं एंड्रियाने सांगितलं.

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक 

मनिषचे इतर मुलींशीही संबंध आहेत. याबद्दल तिने विचारल्यावर त्याने तिच्याही बोलणे बंद केले होते. नोव्‍हेंबरमध्‍ये तिला कोणीतरी मनीषचे चॅट्स आणि आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. त्यावर तिनं मनिषला विचारणा केली. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. नंतर त्याने माफीपण मागितली, हेही तिनं यात नमुद केले. त्‍यामुळे तिनं कुठलीही तक्रार केली नाही.

परंतू, त्यानंतर तिची ऐकण्‍याची क्षमता कमी झाली आणि ती डिप्रेशनमध्‍ये गेली, असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. शिवाय तिने अनेकदा सलमान खानला याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यापर्यंत तिला पोहोचता आले नाही. तिने सलमानला मॅसेजही केले, परंतू सलमानने वाचून उत्तरही दिले नाही, असंही तिने म्हटले आहे.