बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार संजय दत्तला श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून संजय दत्त यांची कोरोना रॅपिडची ही चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान संजय दत्त यांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना नॉन-कोविड वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे.

संजय दत्त हे मुंबईत एकटेच राहत असून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पत्नी मान्यता व त्यांची दोन्ही मुलं शहरान आणि इकरा दुबईत वास्तव्यास आहेत. दरम्यान या काळात संजय दत्त यांनी आपल्या कुटुंबाला मिस केले आणि अनेक वेळा सोशल मीडियावर फॅमिली फोटो देखील शेअर केले आहेत.