अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

फू बाई फू फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन झाले असून ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee72c6ed-c6c0-11e8-93b3-b154dd3ae150′]

नाट्यसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संतोष मयेकर यांनी मराठी चित्रपटांमध्येही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने वेगळी छाप उमटवली होती. फू बाई फू या कार्यक्रमात त्यांनी धमाल विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २००६ मध्ये देवाशपथ खोटे सांगेन या मराठी चित्रपटाद्वारे संतोषने मराठी चित्रपटामंध्ये पदार्पण केले होते.

‘ग्लो ऑफ होप’च्या गीता उपळेकर यांचे निधन

विविध मालिका आणि नाटकांमध्येही त्यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. भैय्या हातपाय पसरी, वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका आदी नाटक, मालिकेत त्यांनी काम केले. पण भैय्या हातपाय पसरी या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. अर्थ, दशक्रिया, इंडियन प्रेमाचा लफडा, एक तारा, गलगले निघाले, सातबारा कसा बदलला, सत्या सावित्री आणि सत्यवान सारख्या चित्रपटांमधून संतोश मयेकर यांनी काम केले होते. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

[amazon_link asins=’B071NB4PGV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9a0be27-c6c2-11e8-b1bf-c5c4bf3f5625′]