भोसरी औद्योगिक वसाहातीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी औद्योगिक वसाहातीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. निमा संघटना आणि नाम फाऊंडेशनच्या पदाधिकारी समवेत अभिनेते शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. एमआयडीसीने खासगी विकसकास दिलेला भूखंड रद्द करून तो भूखंड परत निमा संघटनेला द्यावा, अशी मागणी केली आहे.

शहरातील निमा संघटनेसाठी दिलेला भूखंड ज्यावर शेकडो वृक्ष लावलेली आहेत. तो भूखंड महापालिकेचा असताना एमआयडीसीने परस्पर विक्री केलेला आहे. तो भूखंड परत निमा संघटनेला मिळावा व तेथील वृक्ष संवर्धन व्हावे, म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांनी आयुक्तासोबत चर्चा केली. यावेळी नाम फाऊंडेशनचे अमित गोरखे, सिटीझन फोरमचे धनजय शेडबाले, तुषार शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे, निमा संघटनेचे डॉ. महेश पाटील,डॉ अभय तांबिले उपस्थित होते.